"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग ३ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
आपण सुखलोलुप आहोत म्हणून भ्रष्ट आहोत आणि भ्रष्ट आहोत म्हणून यशस्वी व्यावसायिक आहोत?
एकाद्या समाजाने "आपण कसे आहोत किंवा कसे असायला हवे" याबद्दलच्या कांहीं कल्पना आधीपासूनच बनविलेल्या असतात. अशा समाजाच्या स्वभाववैशिष्ट्यांचे केलेले चित्रण त्या कल्पनांशी तंतोतंत जुळत नाहीं म्हणून त्या चित्रणातली टीका चुकीची ठरत नाहीं.
समाजाची स्वभाववैशिष्ट्यें कांहीं एकाद्या जादूगाराच्या पोतडीतून बाहेर काढता येत नाही, मग त्या जादूगाराचा हेतू कितीही चांगला असो! या उलट राष्ट्राची खरी शक्ती आणि चिकाटी बर्याचदा आपल्या स्वत:बद्दलच्या अशा अतिरंजत कल्पनांच्या बाहेरील स्वभाववैशिष्ट्यांतच असते. कुठलेही एक स्वभाववैशिष्ट्य बाकीच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून अलग करून पहाता येणार नाहीं, सगळी स्वभाववैशिष्ट्ये एकत्रच पाहिली पाहिजेत. उदाहरणार्थ भारतातील ऊतू जाणारा प्रचंड भ्रष्टाचार! मूलभूतपणे पाहिल्यास भ्रष्टाचार नकारात्मकच आहे पण भारतीयांनी भौतिक ऐश्वर्याला इतके महत्व दिले नसते (आणि त्यापायी भ्रष्टाचार केला नसता) तर ते कल्पक व्यावसायिक बनूच शकले नसते. या उलट ते जर इहलोकापलीकडील स्वर्ग-नरकाच्या कल्पनात रमले असते आणि त्या पायी अति सज्जनपणे वागून अंतिम यश मिळविण्यासाठी कांहींही बरे-वाईट करणारे ’व्यवहारी’ बनले नसते तर ते नक्कीच भ्रष्टाचारी नसते!
निंद्य स्वभाववैशिष्ट्येच भारताला उपयुक्त?
एकाद्या समाजाचे व्यक्तिमत्व हा खूपच गुंतागुंतीचा आणि परस्पर जुडलेला विषय आहे हेच खरे. त्याचे आपल्या पसंतीनुसार तुकडे करता येणार नाहींत. भारतीयांची पूर्वीच्या काळची कांहींशी ’निंदात्मक’ स्वभाववैशिष्ट्येच भारताला उपयोगी पडली होती असे सिद्ध करण्याचा हे पुस्तक प्रयत्न करणार आहे. उदाहरणार्थ पाश्चात्य विचाराप्रणालींनी प्रभावित झालेले घटना परिषदेतील कांहीं सभासद मानत कीं समाजातील प्रत्येक घटकाला समानता देण्यासाठी सांसदीय लोकशाही हीच एक जादूची कांडी आहे. ज्या भारतीयांना त्यावेळी खरोखरच जर असे वाटले होते त्यांचा आज पार भ्रमनिरास झाला असता आणि जसा इतर विकसनशील देशानी हुकुमशाहीचा अवलंब केला तसा भारतानेही केला असता. पण इंग्लंडहून आयात केलेले हे नुकतेच उडायला शिकलेले नवजात ’कलमी रोपटे’ इथे जगले कारण बहुतेक भारतीयांना लोकशाही म्हणजे स्वत:ची उन्नती करून घेण्याचा राजरोस आणि परिणामकारक मार्ग आहे हे लक्षात आले होते. भारतातील लोकशाहीच्या वाढीच्या दृष्टीने ही सुदैवी घटना होती असेच म्हणावे लागेल. पुरेसा वेळ दिल्यानंतर हे लोकशाहीचे फुलपाखरू आपल्या सदोष कोषावस्थेमधून बाहेर पडायला आता तयार झाले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या स्वाभाविक मोहाने लोकशाहीच्या प्रक्रियेत भाग घेण्यात जास्त-जास्त मातब्बर लोकांना (आणि त्यांच्या ’कळपा’तल्या अनुयायांना) एक तर्हेची प्रेरणाच मिळाली. निरंकुश अस्थिरतेच्या जन्मजात भीतीचे बाकी कितीही दोष असोत पण त्या भीतीने ’कुदेता’सारख्या हिंसापूर्ण पद्धतीने भारतातील सरकार बदलले गेलेले नाहीं. आर्थिक फायद्याला मिळणारा अस्थानी आदर आणि त्यातून मिळणारी ऐहिक सुखे यामुळे व्यापारी वर्ग दिवाळखोरीपासून दूर राहिला व त्यांच्यातील उद्योजकतेला खतपाणी मिळाले. उदाहरणार्थ "बर्कीना फासो" सारख्या आफ्रिका खंडातील एका देशाच्या ’वागाडूगू’ या राजधानीतले एकुलते एक डिपार्टमेंटल स्टोअर निर्धन अवस्थेत हातात फक्त एक लोटा घेऊन कांहीं वर्षांपूर्वी आलेल्या एका भारतीयाच्या मालकीचे आहे. जिथे जीवावरच बेतते तिथे वीरोचितपणे शेवटच्या सैनिकापर्यंत लढण्यापेक्षा तडजोड करून परस्पर मदतीने जगण्याकडे जात्याच असलेल्या कलामुळेच हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज दोन्ही एका पाठोपाठ आलेल्या आणि जबरदस्तीने धर्मांतर करविणार्या आक्रमकांपेक्षा जास्त लाळ जगल्या आणि त्यांच्या सहवासाने त्यांनी कांही चांगल्या गोष्टी उचलल्यासुद्धा!
महत्वाच्या तीन आगामी घटना; पहिली अखिल-भारतीयत्व
या पुस्तकात नजीकच्या भविष्यकाळात होऊ घातलेल्या तीन घडामोडींची चर्चा केलेली आहे. येत्या कांहीं वर्षात या घडामोडींचा भारतीयांच्या व्यक्तिमत्वावर खूपच प्रभाव पडणार आहे. पहिली घडामोड आहे सकल-भारतीयत्वाबद्दल (pan-Indianness). भारताच्या सांस्कृतिक ऐक्यावर खूप लिखाण झालेले आहे आणि ते योग्यच आहे. पण या लिखाणांतून एकमेकांपासून दूर गेलेल्या आणि खूप विविधता असलेल्या भारतीयांच्या संस्कृतील बारीक-बारीक साधर्म्य ओळखण्याचा प्रयत्न होता. इतिहास, संस्कृती, परंपरा याच्यामुळे भारतीयांचे स्वत:चे ओळखू येण्यासारखे व्यक्तित्व घडविले गेले आहे आणि त्यात भारतीय मानसिकतेतील स्पष्ट छटाही आहेत. पण या ऐक्याला सकल-भारतीयत्वाचे व्यक्तित्व आलेले नव्हते. वाराणसीतील भारतीय आणि त्रिचुर येथील भारतीय संस्कृतमधले तेच धडे गिरवत असले किंवा दोघेही तेच सण साजरे करत असले तरी एकमेकांबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. आपापसात फारसा संपर्क नसल्यामुळे या भारतीयांची आपापसात अनुभवांची देवाण-घेवाणही नव्हती. १९४७ सालानंतरच्या दशकांत यात हळूहळू बदल होत गेला व अलीकडच्या कांहीं वर्षांत हा बदल नाट्यपूर्ण वेगाने घडलेला आहे!
महत्वाची दुसरी घटना-समाजरचनेतील मोठे बदल
माझ्या यादीतील दुसरी आगामी घटना आहे पूर्वीच्या काळी अत्यंत पवित्र समजल्या जाणार्या समाजरचनेचा (social hierarchy) हळू-हळू पण लक्षात येण्याइतका झालेला र्हास. भारतीय लोकांना आपल्या समाजरचनेची, पदक्रमाबाबतची (hierarchy) खूपच जाणीव असते. त्यात आपापल्या जातीवरील निष्ठा आजही व्यापकप्रमाणात शिल्लक आहे. पण आतापर्यंत शांत असलेले आणि सामाजिक वर्णपटाच्या शेवटच्या पायरीवर समजले जाणारे दलित लोक ही बंधने झुकारून टाकायला पूर्वी कधीही नव्हते इतके उत्सुक झालेले आहेत. देशाच्या संपत्तीतील मोठा हिस्सा आपल्याला मिळण्याबद्दलची त्यांची महत्वाकांक्षा आता दडपणे किंवा दडविणे आता शक्य नाहीं. लोकशाहीच्या राजकारणाचे असले ’अनिष्ट’ परिणाम प्रस्थापित उच्चपदस्थांना अभिप्रेत नसतील पण लोकशाहीने टप्प्याटप्प्याने बहाल केले अधिकार आणि त्यातून ठिबकत खाली आलेली आर्थिक सुबत्ता यामुळे जास्त-जास्त भारतीयांमध्ये त्याबद्दलच्या महत्वाकांक्षा आणि अपेक्षा पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या जागृत झाल्या. अशा तर्हेने नव्याने अधिकार मिळविलेले आणि प्रगतीच्या दिशेने निघालेले भारतीय एकविसाव्या शतकात भारताचे परावर्तन कसे करतील? समाजात शतकानुशतके चालत येऊन प्रस्थापित झालेल्या चालीरीतींची प्रत्यक्ष व्यवहारात नव्याने कसून चौकशी केली जाऊन त्यांना जेंव्हां आव्हान देण्यात येईल-तेसुद्धा राजकीय नेत्यांच्या शाब्दिक अवडंबरापलीकडे जाऊन-तेंव्हां कसल्या तर्हेचा आगडोंब उसळेल? जुन्या समाजरचना आणि त्या समाजरचनांतून उद्भवलेली मानसिक प्रवृत्ती यांचे नव्याने जोषात आलेल्या आणि हिरीरीने बदल घडवू पहाणार्या सुधारकांकडून संपूर्ण उच्चाटन होईल? कीं हे सुधारक जुलुमी प्रवृत्तीचा नाश करण्याऐवजी त्यांच्यावर एकेकाळी अन्याय करणार्यांचे अनुकरण करून फक्त आपल्या पोळीवर ओढता येईल तितके तूप ओढण्यातच दंग होतील?
महत्वाची तिसरी घटना-माहिती तंत्रज्ञानातील जागतिक शक्ती भारत
माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक "जागतिक शक्ती" या नात्याने झालेला भारताचा उदय ही माझ्या यादीतील तिसरी घटना आहे. जगातल्या सर्वात जास्त अशिक्षित लोक असलेल्या देशाकडे असे माहिती-तंत्रज्ञानाचे नेतृत्व यावे हा एक विरोधाभास आहे, पण शिक्षणाला भारतातील उच्चभ्रू (Elite) समाजाने-त्यातही ब्राह्मण समाजाने-आपले प्रस्थापित श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी नेहमीच अनन्यसाधारण महत्व दिले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्राथमिक शिक्षणाची जपमाळ बळेबळे ओढता-ओढता उच्च शिक्षण देणार्या संस्था उभारून त्या चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतविणे सत्ताधार्यांनी सातत्याने चालू ठेवले. या दुटप्पी धोरणाचे गेल्या पन्नास वर्षांत भाकितानुसार झालेले परिणाम दिसून येत आहेत. तंत्रज्ञानात प्राविण्य असलेला जगातील एक सर्वात मोठा समाज आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि संगणकाच्या तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण देऊ शकणार्या अनेक संस्था भारतात उदयास आल्या. राजकारणाच्या ’व्यवसाया’प्रमाणेच उच्च शिक्षणाने विभूषित असणे ही झटपट प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारी एक गुरुकिल्लीच ठरली. माहितीतंत्रज्ञानाच्या या क्रांतीतील तरुण भारतीयांच्या सहभागाकडे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. भारतातील ’सॉफ्टवेअर’मध्ये तज्ञ असलेल्या व्यावसायिकांना जागतिक स्तरावर मागणी आहे. ***आज भारताच्या ’सॉफ्टवेअर’ उद्योगाच्या निर्यातीची तूलना अरब देशांच्या तेलनिर्यातीशी केली जाऊ लागली आहे. ’कॉल सेंटर’ उद्योगात भारताला एक जागतिक शक्ती (Superpower) समजले जाऊ लागले आहे. जगातील ५०० सर्वात मोठ्या उद्योगातील ४० टक्के उद्योग त्यांचे हिशेब-ताळेबद ठेवणे, डिझाईन-ड्रॉइंगचे काम, गिर्हाइकांबरोबर संपर्क ठेवण्याचे काम वगैरे आज भारतात करत आहेत. ही चढती कमान अशीच टिकून राहील काय? भारतीयांना या क्षेत्रात उपजत कौशल्य आहे काय? या क्रांतीत किती भारतीय सहभागी होतील आणि या क्रांतीचा फायदा घेतील? ’सिलिकन व्हॅली’तील नव्याने लक्षाधीश झालेल्यांच्या या नवीन उपक्रमाचे किती प्रमाणावर अनुकरण केले जाईल? कीं आपण ’सॉफ्टवेअर’ क्षेत्रातले हमाल रहाण्यातच समाधान मानू? याही पुढे जाऊन हे पाहिले पाहिजे कीं या नव्या प्रथेचा भारतीयांच्या प्रतिमेवर कसा परिणाम होईल? उदाहरणार्थ सायप्रसमध्ये घरकामाला येणार्या मोलकरणी आणि नोकर-चाकर श्रीलंकेतून आणि फिलिपीन्समधून येतात तर ’सॉफ्टवेअर’ क्षेत्रातले तंत्रज्ञ भारतातून येतात. अशा तर्हेच्या जागतिक अपेक्षानुसार भारतीय तंत्रज्ञ स्वतःला बदलतील काय? आणि कुठल्या बाबतीत ते न बदलता आहेत तसेच रहातील?
भारतीय समाज बदलेल?
समाज बदलत रहातो पण बदल किती घडेल यालाही सीमा असते. शतकानुशतके अंगवळणी पडलेली कांहीं स्वभाववैशिष्ट्ये, लकबी बदलणार नाहींत. आणि ही न बदलणारी स्वभाववैशिष्ट्येच समाजाच्या व्यक्तिमत्वाला एक स्पष्ट आणि स्वतःचे असे सांस्कृतिक ’चिन्ह (label)’ देतात. बाकीची स्वभाववैशिष्ट्ये सौम्य होऊ शकतात किंवा बदलता येऊ शकतात. आधी नसलेल्या स्वभाववैशिष्ट्यांची भर घालता येते पण अशा तर्हेने भर घालण्याने आलेली स्वभाववैशिष्ट्ये म्हणजे एकाद्या भव्य इमारतीवर काम करताना कामगारांना उभे रहाण्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या आधारफळ्यासारखीच (scaffolding) असतात आणि या आधारफळ्यामुळे मूळ इमारतीवर कांहींही परिणाम होत नाहीं. आणि या नव्या-जुन्या स्वभाववैशिष्ट्यांच्या संयोगातून होणारी सांस्कृतिक घडणच प्रत्येक मनुष्याला आयुष्यभर साथ देते आणि भविष्यकाळाकडे घेऊन जाते.
Sunday, 27 February 2011
Wednesday, 16 February 2011
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग २ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग 2 - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
----------------------------------------------------
पुनर्मूल्यमापन
कुठल्याही गोष्टीचे पुन्हा मूल्यमापन करताना सर्वात पायाभूत गरज असते ती प्रामाणिकपणाची. ज्या देशात एकाद्या व्यापार्याला "महाजन" म्हटले जाते, ज्याचे नागरिक धनाची आणि वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीची मनःपूर्वक आराधना करतात व ऐहिक सुखांना व अर्थार्जनाला आयुष्याचे मुख्य ध्येय मानतात त्या देशाच्या नागरिकांना अध्यात्माची आवड असलेले कां समजले जाते? आपण अध्यात्मिक कसे आणि ज्या अध्यात्मिकतेची आपण इतकी बढाई मारतो ती आपल्या आयुष्यात कुठली भूमिका पार पाडते? जात, संस्कृती आणि भाषा याबाबत इतकी विविधता असलेला आपला देश अद्याप एकसंध कसा राहिला? तो असा एकसंध राहिला ते भारतीयांचा 'आत्मा' एक असल्यामुळे कीं आपल्यातल्या ’सकल-भारतीयत्वा’च्या वाढत्या जाणीवा बळे-बळे जोपासलेल्या उच्चतेच्या जाणीवेमुळे नसून या उलट आपण खरेखुरे कसे आहोत याची पक्की जाणीव झाल्यामुळे आहेत?
वरील प्रश्नांची उत्तरे थंड डोक्याने देणे जरूरीचे आहे. हे प्रश्न टीकेचे मोहोळ उठविण्यासाठी किंवा कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी विचारलेले नाहींत. त्या प्रश्नाचे तसे मूल्य कांहींच नाहीं, ते केवळ आपले मूल्यमापन पुन्हा करण्यास भाग पाडण्यासाठी आहेत. या प्रश्नाची उत्तरे देता-देता या पुस्तकाचा दडलेला उद्देशही उलगडेल आणि तो उद्देश इथेच सारांशाने सांगणे हितावह होईल असे वाटते. भारतीय लोक सत्तेच्या समीकरणाबाबत अतीसंवेदनाशील असतात. सत्ता मिळविणे म्हणजे आयुष्याची एक कायदेशीर ध्येयपूर्ती आहे असे ते समजतात आणि सत्तेशी तडजोड करण्यात, तिच्याशी जुळवून घेण्यात आणि सत्तेचा केंद्रबिंदू शोधण्यात ते आपला धूर्तपणा वापरतात. ते सत्ताधार्यांबद्दल आदर बाळगतात आणि त्यांच्याबरोबर स्वार्थापोटी सहकार्य आणि संगनमत करायला उत्सुक असतात. सत्तेसाठी गटबाजी करायला किंवा कारस्थाने शिजवायला ते एका पायावर तयार असतात. सत्तेच्या मोहाचा व प्रलोभनाचा त्याग करतात त्यांचा ते आदर करतात. पण हा आदर त्यांच्या या वृत्तीचे अनुकरण करण्यासाठी नसतो तर केवळ त्यांच्या अशा मोहावर विजय मिळविणार्या वृत्तीच्या आदरापोटी!
वरिष्ठांसमोर नम्र पण कनिष्ठांबद्दल बेपर्वाई
अलीकडे झालेल्या बदलांची चर्चा आपण (या पुस्तकात) नंतर करू पण हे बदल जरी झाले असले तरी भारतीय लोकांचा कल अधिकारपदाच्या क्रमवारीला अतोनात मान देण्याकडे असतो. ज्यांना ते स्वतःपेक्षा वरिष्ठ समजतात त्यांच्यापुढे ते जरूरीपेक्षा जास्त झुकतात आणि ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात त्यांच्याशी ते बेपर्वाईने वागतात, त्यांना उपेक्षितात किंवा त्यांची हेटाळणी करतात. त्यामुळे स्वतःच्या सामाजिक स्थानानुरूप असणार्या स्वतःबद्दलच्या सन्मानाच्या कल्पना आणि स्वतःची वैयक्तिक प्रतिमा याचे भारतीयांच्या लेखी भरमसाट महत्व असते. त्यांची उपजत प्रवृत्तीनुसार आणि स्वभावतः त्यांचा कल लोकशाहीकडे नाहीं. इथे लोकशाही इतकी सहजासहजी रुजली याचे कारण या पद्धतीने झटपट मोठे होता येते आणि वैयक्तिक सत्ता, शक्ती आणि वैभव प्राप्त करून घेता येते याची त्यांना झालेली जाणीव!
भारतीय नागरिक इहलोकापलीकडचा विचार करणारे कधीच नव्हते किंवा कधीच असणारही नाहींत. त्यांना जगात उपलब्ध असलेल्या ऐहिक सुखसोयींचा प्रचंड सोस असतो आणि ते श्रीमंतांकडे आदराने पहातात. ते नफ्यामागे इतरांपेक्षा जास्त चिकाटीने लागतात. त्यामुळे ते धूर्त व्यापारी किंवा कल्पक आणि चतुर व्यवसायी बनू शकतात. त्यांची पावले खंबीरपणे जमीनीवर असतात आणि डोळे आपल्या जमाखर्चाच्या कीर्दवहीवर! (As in the case of temporal power) इहलोकाच्या 'कायद्या'नुसार भारतीय लोक अंतिम यशस्वी निकालाला महत्व देतात, तो मिळविण्यासाठी अनुसरलेल्या मार्गाला नाहीं. भारतीयांचा अध्यात्मिक कल जरी एक तत्वज्ञानाचा भाग म्हणून उदात्त असला तरी भारतीय लोक त्यांचा आपल्या धार्मिक चालीरीतींत केवळ सत्ता आणि वाईट मार्गाने वैभव मिळविण्यासाठी समावेश करतात. वाईट काळातून जाताना या तत्वज्ञानाचा उपयोग होतोच कारण त्यामुळे भारतीयांची चिकाटी वाढते. बहुतेक भारतीय इहलोकाच्या पलीकडीचा जो विचार करतात तो केवळ त्यांना स्वतःला ताबडतोब मिळाणार्या फायद्याशी संबंध नसलेल्या त्यांच्या भोवतालच्या सामाजिक वातावरणाबद्दलच्या औदासीन्याचा भाग असतो.
ईप्सित साध्य होत असेल तर भ्रष्टाचार बरोबर?
समाजातील असमता, गलिच्छपणा आणि मानवी हाल-अपेष्टां यांचा आश्चर्य वाटावे इतक्या सहजपणे स्वीकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचा पुरावा म्हणजे त्यांचा स्वतःत पूर्णपणे गुंतून जायचा स्वभाव! भारतीय लोक व्यवहारी असतात आणि त्यांचा दृष्टिकोन स्वाभाविकपणे अनैतिक असतो. हिंदु धर्मात पराकोटीच्या पापाची कुठलीही व्याख्या नाहीं. कुठल्याही कृतीचे ठराविक संदर्भात समर्थन करता येते आणि हिंदू लोक देवाला नित्यनेमाने 'लांच' देतात! भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे कारण आपले ईप्सित साध्य होत असेल तर भ्रष्टाचार ही चुकीची गोष्ट असे मानलेच जात नाहीं. भ्रष्टाचार पकडला गेला तर त्यावर जो नैतिक गदारोळ उठतो त्याची तीव्रता तो भ्रष्टाचार किती प्रमाणात स्वीकारण्याजोगा असतो त्याच्या विषम प्रमाणात असते. नैतिकतेची कल्पना आणि उच्च विचारसरणीचे तत्व भारतीयांना एक तात्विक पातळीवर आवडते पण रोजच्या आचरणात तत्व ते अव्यवहार्य म्हणून दुर्लक्षिले जाते.
मिरविण्यापुरती आधुनिकता?
नेहरूंच्या किंवा पाश्चात्यांच्या व्याख्येनुसर 'आधुनिकता' म्हणजे कुठल्याही विषयावर बुद्धीचा वापर करून पूर्वग्रहाशिवाय विचारपूर्वक प्रतिसाद देणे. अशी आधुनिकता हे सुशिक्षित भारतीयांचे लोकांत सांगायचे ध्येय आहे. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय आणि वस्तुनिष्ठपणे असे म्हटता येईल कीं असे ध्येय अंगावर चढविलेली आधुनिकतेची झूल आहे व या झुलीच्या खाली भारतीयांवर सातत्याने असलेली रूढींची पकड लपविली जाते असे. भारतीयात आधुनिकता आणि रूढी ज्या पद्धतीने एकत्र नांदतात ती पद्धती खरोखर अनोखी आहे. शेवटी हिंदू हे हाडाचे अहींसावादी नसून ते व्यवहारीपणे हिंसेच्या मर्यादा समजून घेतात. जिवंत रहाण्याच्या अंतिम ध्येयासाठी ते हिंसा टाळायला तयार असतात. आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या शक्तीच्या विरुद्ध लढून आणि स्वतःचा आत्मघाती सर्वनाश करून घेण्यापेक्षा अंतर राखून एकत्र रहायला ते तयार असतात. त्यांची इतर धर्मांबाबतची ऐतिहासिक सहिष्णुता-खास करून लष्करी शक्तीचे पाठबळ असलेल्या धर्मांबाबतची-या संदर्भात समजण्यासारखी आहे. भारतातही जातीय दंगली होतात आणि जरी त्या ज्या पद्धतीने दाखविल्या जातात त्यांना 'प्रमाण' मानता येणार नाहीं. साधारणपणे ज्या हिंसेमुळे कांहीं प्रमाणात का होई ना अस्थिरता किंवा अराजक निर्माण होऊन समाज व्यवस्थेला भीती निर्माण होऊ शकते अशा हिंसेच्या भारतीय लोक विरुद्ध असतात. पण जातीय उच्च-नीचतेची किंवा शुद्धतेची अंमलबजावणी करण्याच्या नियंत्रित वातावरणात-ज्यात हिंसेला परंपरागत अनुज्ञा असेल किंवा जिथे आपल्या संख्येचे प्राबल्य असेल तिथे हिंदूही इतरांइतकेच हिंसक बनू शकतात!
कांहीं ठळक स्वभाववैशिष्ट्ये वर दिलेली आहेत पण ते त्यांचे संपूर्ण वर्णन नव्हे. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मनुष्यस्वभावात अगणित वेगवेगळ्या सूक्ष्म छटा असतात आणि स्वभाववैशिष्ट्यांत नेहमीच विशिष्ट तफावत असू शकते. भारतीय स्वभाववैशिष्ट्यांचे हे शब्दचित्र म्हणजे एक टीकात्मक समालोचनाचा प्रयत्नही नव्हे. हे शब्दचित्र आणि आपल्या स्वत:बद्दलच्या परंपरागत प्रतिमा यात नक्कीच फरक आहे. पण एकाद्या विशिष्ट नैतिक मापनदंडाने मोजल्यास कुठलीच राष्ट्रे 'चांगली किंवा वाईट', 'प्रबळ किंवा दुर्बळ' नसतात.

Friday, 11 February 2011
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग १ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा
अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश
"भारतीय असणे म्हणजे काय?" याबाबत एक नवे आणि आणि अगदी 'सोळा आणे' वेगळे संशोधन करणे हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे! असे संशोधन फक्त भारतासाठीच नव्हे तर सार्या जगाच्या बाबतीतही तदनुषंगिक आणि प्रसंगोचित आहे. एकवीसाव्या शतकात सहातला एक मनुष्य भारतीय असणार आहे. भारतीय बाजार हा जागतिक बाजारपेठेत दुसर्या क्रमांकावर असणार आहे. त्यात खरेदी करण्याची ऐपत असलेल्या मध्यमवर्गीयांची संख्या ५० कोटीला पोचेल. खरेदीसामर्थ्यात समानता आणल्यावर (purchasing power parity) भारताची अर्थव्यवस्था आताच जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्याबाबतीत (gross national product) भारत पहिल्या दहात आहे. जगात सर्वात विशाल लोकशाही राबविणारा भारत आता अण्वस्त्रसज्ज असून आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान मिळविण्याचा आपला हक्क तो बजावू पहात आहे.
या शिवाय भारतीय उपखंडात दूरगामी व्यापक बदल होत आहेत. फ्रान्सच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त पदवीधर आज भारतात असून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे. आज सॉफ्टवेअरची निर्यात (२००४ सालची) ५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतीय लोक आज सार्या जगभर पसरले असून अशा तर्हेच्या जगभर पसरलेल्या नागरिकांच्या बाबतीत (Diaspora) भारत चीनखालोखाल दुसर्या क्रमांकावर आहे. मूळच्या भारतीय लोकांचा जनसमुदाय आज अमेरिकेतला सर्वात जास्त श्रीमंत समुदाय बनलेला आहे. इंग्लंड आणि मध्यपूर्वेतल्या राष्ट्रांत व इतरत्रही भारतीय लोकांचे वैभव व श्रीमंती वाढत आहे. या नव्या शतकात जगातील जनतेला-मनापासून असो वा मनाविरुद्ध-पण भारतीयांशी संबध ठेवावेच लागतील. म्हणूनच "भारतीय असणे म्हणजे काय?" हे जास्तच सुस्पष्टपणे व प्रामाणिकपणे जाणून घेणे जरूरीचे आहे.
पाश्चात्य लोकांना भारतीय कसे दिसतात?
यापूर्वी अशा तर्हेच्या संशोधनात दोन गोष्टींमुळे अडचण येत असे. पहिली होती कीं सारे परदेशातील लोक भारतीयांकडे "एका छापातून बनविलेले लोक" अशा नजरेने पहात. आणि दुसरी होती भारतीय लोक स्वतःची प्रतिमा जगापुढे कशी ठेवीत ही. भारतात असताना परदेशी लोक भारतीयांकडे एक 'आ' करून तरी पहात रहातात किंवा आवंढा तरी गिळतात. साधारणपणे भारतातल्या श्राव्य व दृश्य अनुभवांमुळे ते पार भारावून जातात. याबद्दल खूप उदाहरणे देता येतील पण कांहींसे भावनांनी भारावून गेल्याचे एक बोलके उदाहरण पुरेसे व्हावे.मार्क ट्वेन यांनी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी भारताच्या दिलेल्या आपल्या भेटीनंतर लिहिले आहे, "अद्भुतरम्य स्वप्नांचा आणि प्रणयाचा, प्रचंड वैभव आणि कमालीचे दारिद्र्य असलेला, भुताखेतांचा, आत्म्यांचा, राक्षसांचा आणि अल्लादीनच्या जादूच्या दिव्यांचा, हत्ती-वाघांचा, शंभर जिभांचा आणि शंभर 'देशां'नी बनलेल्या 'राष्ट्रा'चा, वीस लाख देव-देवतांचा, मानवतेची जन्मभूमी असलेला, मानवी बोलीभाषेला जन्म दिलेला, इतिहासाची जननी, आख्यायिकांची आजी आणि रूढींची पणजी असलेला हा खरा भारत आहे."
साम्राज्यशाहीच्या कालावधीत भारताबद्दलचे समज काहींसे वेडेवाकडे, दिशाभूल करणारे झाले होते. यालाच एडवर्ड सेड यांनी (Edward Said) पश्चिमेचे पौर्वात्यीकरण असे नांव दिले होते. पाश्चात्यांच्या मते पौर्वात्य देश म्हणजे जगाची अपरिचित अशी 'दुसरी' बाजू होती व त्यांना अपरिचित असे वेगळे आणि चमत्कारिक लोक तिथे रहात. भारतीय लोक म्हणजे एक अतीशय आनंदी किंवा धिक्कारक्षम लोक अशीच भावना बहुतेक सर्व इंग्लिश लोकांच्या मनात असे. न जोडता येण्याइतक्या ठिकर्या झालेले, परमार्थात श्रेष्ठ असलेले, राज्य करण्यास अतीशय अवघड किंवा विनासायास आत्मनिर्भर असलेले, पैशाचा अत्यंत लोभाने कुठलेही दुष्कृत्य करायला तयार असलेले किंवा सर्व ऐहिक गोष्टींबद्दल पूर्णपणे उदासीन असलेले, पूर्णपणे गूढ किंवा अंतरंग पूर्णपणे उघड करणारे राष्ट्र असे भारताचे परस्परविरोधी विविध पैलू पाश्चात्यांना दिसत. तसेच त्यांच्या मते भारतीय म्हणजे एक शताळशी किंवा विस्मय वाटण्याइतके मेहनती-उद्योगी, अतोनात अंधश्रद्ध किंवा असामान्यपणे विकसित, किळस येण्याइतका लांगूलचालन करणार किंवा नेहमीच बंडखोर असलेला, अतीशय गुणवान किंवा उघड-उघडपणे नक्कल करणारा, अतीशय सुसंस्कृत किंवा अतीशय गरीब, म्हणजेच थोडक्यात सर्वगुणसंपन्न! ब्रिटिशांची हुशारी एकाद्या विशिष्ट गोष्टींबद्दल असे. उदा एकाद्या प्रदेशातल्या वनस्पती किंवा प्राणिजात किंवा भूगोलासंबंधीचे लिखाण. पण बर्याचदा विशिष्ठ गोष्टी लिहिताना असल्या निवेदनांत सहजपणे सर्वसाधारण, न अभ्यासलेली वर्णनेही घुसडली जात. संस्कृतचा गाढा व्यासंगी असलेला आणि हिंदू तत्वज्ञान अभ्यासण्यासाठी सारे आयुष्य भारतात व्यतीत केलेला जर्मन अभ्यासक मॅक्समुल्लर नेहमी "भारतीय लोक अतीशय प्रामाणिक असतात" असा दावा तावातावाने करीत असे.
स्वातंत्र्ययुद्धात महात्मा गांधींचे नेतृत्व, जातीय एकोप्याब्द्दलची त्यांची वैयक्तिक बांधिलकी आणि ब्रिटिशांना हरविण्याचे डावपेच म्हणून त्यांनी अंगिकारलेले अहिंसेचे व्रत या सर्व गोष्टींमुळे जगात भारताची 'सहिष्णु आणि अहिंसक राष्ट्र' अशी एक नवीन प्रतिमा निर्माण झाली. पं. नेहरू खूप वर्षें पंतप्रधानपदी राहिले व त्यांच्या कारकीर्दीत कोट्यावधी लोकशाहीप्रेमी भारतीय लोक सांप्रदायिकता सोडून आधुनिकतेकडे वाटचाल करण्याची खटपट करत आहेत असे एक नवे चित्र जगाला दिसले. तरीसुद्धा या देशात स्पष्ट दिसणारे वैविध्य आणि सांस्कृतिक रूढींमधील गुंतागुंत या दोन गोष्टींमुळे भारताबद्दल अचूक आणि सखोल ज्ञान/ओळख होण्यात अडचणी येत होत्या. नेहरूंचे मित्र असलेले व भारतात राहिलेले अर्थतज्ञ श्री. जॉन गॉलब्रेथ यांनी भारताचे "व्यवस्थित चालणारी अंदाधुंदी" असे वर्णन केले आहे. (कांहीं वर्षांनी त्यांनी ते सनसनाटी विधान केवळ स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी केले होते हे मान्य केले.)
भारताचे वाढते महत्व आणि चुकीची प्रतिमा
१९९१ सालची आर्थिक सुधारणा व १९९८साली केलेली अण्वस्त्रचांचणी या दोन घटनांमुळे भूगोल आणि राजकारण यांच्या सहाय्याने व्यूहरचना करण्यात आणि आर्थिक बाबीत प्राविण्य असलेल्या पाश्चात्य विशेषज्ञांच्या 'रडार'वर भारताचा ठिपका जरा ठसठशीत दिसू लागला. 'इकॉनॉमिस्ट' या वृत्तपत्राने 'शेवटी एकदाचा जागा होऊन बाजारपेठेकडे डुलत चाललेला हत्ती' असे भारताचे वर्णन केले. स्टीफन कोहन यांनी एक सुरेख संदर्भासह लिहिलेल्या लेखात "भारत आता सुपरपॉवर बनण्याच्या दृष्टीने वाटलाल करेल कीं नेहमीप्रमाणे 'येणार-येणार'चा मंत्रच जपत राहील" असा जाहीर प्रश्न उपस्थित केला होता. पण असे अस्तित्वासंबंधींचे प्रश्न सर्वसाधारण पर्यटकांना पडत नाहींत. पण दुर्दैवाने असे लोक जितक्या संख्येने यायला हवेत असे भारताला वाटते तितक्या प्रचंड प्रमाणात येत नाहींत. जे येतात ते मुख्यतः भारताची प्राचीन संस्कृती पहायला येतात आणि ती संस्कृती त्याना दुर्लक्षित आणि चोहीकडे विखुरलेल्या स्मारकात दिसते. अशा पर्यटकांनी अध्यात्मिक भारताबद्दल वाचन केलेले असते आणि ते हा अध्यात्मिक भारत दक्षिणेतील मंदिरांच्या उत्तुंग शिखरात पहातात किंवा गंगेच्या पवित्र पाण्यात झटपट आंघोळ करणार्या यात्रेकरूंत पहातात. भारताच्या पोषाखतील आणि आहारातील वैविध्याने त्यांच्या कॅमेर्यातील चित्रफितींची रिळेच्या रिळे संपतात[१]. भारताला येतांना डोक्यात असलेले अद्भुतरम्य चित्र साठवून ठेवण्यासाठी ते हस्तकलेच्या वस्तु स्वस्तात घेतात. सफाईने इंग्रजी बोलण्यार्या भारतीय लोकात आणि शहरातील गगनचुंबी इमारतीत ते अर्वाचीन भारत पहातात. त्यांना फसविणारे दलालांना ते अविकसित देशांत सगळीकडे पसरलेल्या भ्रष्टाचाराचा पुरावा समजतात. घाण आणि गरीबी त्यांना घृणास्पद वाटली तरी अशा घाणीचा व गरीबीचा उगम त्यांना अध्यात्मात गढून गेलेल्या भारतीयांच्या इहलोकापलीकडील कल्पनांचा परिणाम वाटतो. मग शांतिप्रिय म्हणवून घेणारा हा देश अण्वस्त्रचांचणी कशी करू पहातो याबद्दल वादविवाद त्यांच्यात चालतो. पण त्यानंतर लवकरच त्यांची भारतभेट संपत येते आणि ते पर्यटक "एवढा विशाल देश एकसंध कसा राहिला आहे आणि या देशातील गरीब व धड वस्त्रें न ल्यायलेले लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदानात भाग घेऊन लोकशाही जिवंत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत" याबद्दल विचार करत स्वदेशी परततात.
परदेशी पर्यटकांच्या अशा तहेच्या समजुती बर्याच प्रमाणात अचूक असतात. भारतातील सत्य परिस्थिती एकाच वेळी पारदर्शकही असते आणि अपारदर्शकही! जे दिसते त्यातही सत्याचा भाग असतो आणि जे दिसत नाहीं त्यातही! परदेशी लोक जे उघड आहे ते पहातात आणि हे पाहिलेले चित्र आपल्या थोर भारतीय संस्कृती आणि शिष्टतेबद्दलच्या आधीपासून बनविलेल्या कल्पनांशी जोडतात. या प्रकारात बरीचशा गृहीतकांची चिकित्सकपणे सखोल छाननी होत नाहीं आणि बरेच निष्कर्ष निखालस चुकीचे असतात किंवा अंशतःच बरोबर असतात. पण एकवेळ आपण परदेशी पर्यटकांना क्षमा करू शकतो. पण भारतीयांना कशी क्षमा करणार? गेली कित्येक वर्षें भारतीय नेत्यांनी आणि शिकल्या-सवरलेल्या भारतीयांनी भारतियांबद्दलची एक चुकीची प्रतिमा जगापुढे मुद्दाम उभी केली आहे व ती चुकीची आहे हे माहीत असूनही तिला सजवून चांगल्या हेतूने आलेल्या आणि कांहींशा भोळसट परदेशी निरीक्षकांना व कधीकधी अभ्यासकांनाही ही चुकीची प्रतिमा स्वीकारण्यासाठी मुद्दामहून प्रोत्साहन देतात. याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते स्वतःच या खोट्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले आहेत आणि ती प्रतिमा चुकीची आहे हे मान्य करायला तयार नाहींत!
ही प्रतिमा विचारपूर्वक मारलेल्या एका मोठ्या उडीमुळे निर्माण झालेली आहे, "काय आहे"च्या जागी "काय असायला हवे" ही विचारसरणी वापरून केलेली एक हातचलाखीच आहे! भारताने १९४७ सालापासून संसदीय पद्धतीची लोकशाही राबविली आहे. याचाच अर्थ असा कीं भारतीय लोक हे स्वभावाने व प्रवृत्तीने लोकशाहीवादी आहेत हे कुणीच नाकारू शकणार नाहीं. कित्येक धर्म भारतात जन्मले, फुलले आणि वाढले. म्हणजेच भारतीय लोकांचा दृष्टिकोन नक्कीच अध्यात्मिक आहे. वेगवेगळ्या धर्मांना भारतात आसरा मिळालेला आहे त्यावरून भारतीय लोक स्वभावाने खूपच सहिष्णु आहेत हे उघड होते. गांधीजींनी अहिंसेवर विसंबून ब्रिटिशांना हरविले. म्हणजेच भारतीय लोक शांतताप्रिय आणि हिंसाविरोधी आहेत हे दिसते. हिंदूंच्या तत्वज्ञानानुसार आजच्या जगाला एक तात्पुरते व क्षणभंगूर जग आहे. त्यामुळे हिंदूंचे इहलोकानंतरच्या जगाकडे लक्ष असते व ऐहिक वैभवाच्या विचारांबद्दल ते उदासीनच असतात. भारताने अनेक तर्हेचे वैविध्य पोसले आहे. यावरून भारतीय लोक सर्व धर्मातील चांगल्या बाबी निवडणारे आणि उदारमतवादी असतात हे उघड आहे.
प्रतिमा बदलण्याची गरज
भारत आज खूपच महत्वाचा देश बनला आहे व येणार्या पुढील कांहीं दशकात स्वतःचे सामर्थ्य लक्षणीयरीत्या वाढविण्याची क्षमता भारतीयात आहे. त्यामुळे भारताने अशा सुलभ कपोलकल्पित दंतकथा पसरवणे योग्य नाहीं. १९४७ साली अशा दंतकथांच्या वाढींना प्रोत्साहन देण्याची कदाचित गरज असेल. नव्यानेच स्वतंत्र झालेला भारत जगेल काय, टिकेल काय याबद्दल खूपच आशंका जगाला होत्या. आपली राज्यसंस्थाही सुसंघटित नव्हती. फाळणीमुळे जातीय ऐक्य कितपत टिकेल याबद्दलची आशाही खूप रोडावली होती. आपले राष्ट्र एकसंध राहील याबद्दल छातीठोकपणे सांगणे अशक्य होते.
अशा परिस्थितीत सगळीच राष्ट्रे जनतेत ऐक्य निर्माण करण्यासाठी अशा कपोलकल्पित दंतकथा वापरतात. आणि भारताला असे ऐक्य निर्माण करण्याची गरज इतर राष्ट्रांपेक्षा खूपच जास्त होती. पण एका नव्याने जन्मलेल्या व नव्याने उभ्या राहिलेल्या राष्ट्राच्या सरकाराला सोयीचा असलेला हा उपाय पुढे सार्या राष्ट्राची जाणून-बुजून केलेली कायमची फसवणूक होऊन बसला. अशा दंतकथांमध्ये कणभर सत्याचा अंश असल्यामुळे मूळचे कापड आणि त्यावरील विणकाम यातला फरक समजायला हुशार निरीक्षकांनाही जरा वेळ लागला. पण प्रतिमा बनविणार्या व्यवसायिकांनी केलेल्या ढोंगांवर फक्त टीका करणे पुरेसे नाहीं कारण ही बाब त्याहून खूपच जास्त गंभीर आहे. सत्यस्वरूपाला मुद्दाम देण्यात आलेले हे विकृत रूप दोन क्षेत्रात भारताच्या लांबच्या पल्ल्याच्या हितांना हानीकारक आहे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. पहिले आहे नजीकच्या भविष्यकाळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीयांमधील अलौकिक बुद्धिमत्तेच्या लोकांना आणि त्यांच्या क्षमतेला हेरणे आणि दुसरे आहे भारताच्या आणि भारतीयांच्या क्षमतेचे अचूक मूल्यमापन जगापुढे सादर करणे कारण जगाचा भारताशी आणि भारतीयांशी जवळचा संबंध येणे अपरिहार्य आहे.
भूतकाळातील खोट्या समजुतींचे निर्मूलन परिणामकारकपणे करण्यासाठी मोठे धैर्य लागते कारण असे करणे म्हणजे सरकारच्या प्रस्थापित विचारसरणीला आव्हान देण्यासारखे आहे. पण हे काम लांबणीवर टाकून किंवा थातुरमातुर पद्धतीने उरकून चालणार नाहीं कारण असे करण्याने भारताचे खूप नुकसान होणार आहे. आजच्या परिस्थितीत अशा एका बौद्धिक तेजाबाची गरज आहे जो आपल्या बेगडी विश्वावर निर्भर रहाणार्या वेडगळ कल्पनांना विरघळवून टाकू शकेल आणि कांहीं मूलगामी प्रश्न स्वतःलाच विचारायला भाग पाडेल. ५००० वर्षांच्या संपन्न संस्कृतीच्या मुशीतून बाहेर पडलेल्या भारतीय उच्चभ्रू समाजाने इतक्या सहजपणे गुलामगिरी कशी पत्करली आणि ते मॅकॉलेचे आदर्श विद्यार्थी कसे बनले? आपल्या अहिंसाप्रिय स्वभावामुळे आक्रमकांना आपल्यावर वारंवार स्वारी करून आपल्यावर विजय मिळविणे शक्य झाले? कीं आपल्याहून जास्त बलवान असलेल्या शत्रूचे वर्चस्व स्वीकारण्याच्या आणि त्याच्याबरोबर संगनमत करण्याच्या स्वभावामुळे आपण गुलाम बनलो? आपण भारतीय संपन्न व शक्तिशाली शत्रूसमोर इतक्या क्षुद्रपणे लोटांगण कां घालतो? तसेच आपल्यातील गरीबांच्या आणि दुर्बलांच्या हाल-अपेष्टांबाबत आपण इतके उदासीन कां असतो?
आपल्यातील कांहीं ठळक चुका
सामाजिक आणि आर्थिक पद्धतींत इतके ढळढळीत वैषम्य असूनही स्वातंत्र्य मिळवताना किंवा ते मिळाल्यानंतरही कुठल्याही प्रकारची रक्तलांछित हिंसक राज्यक्रांती भारतात झाली नाहीं. हेसुद्धा आपल्या मूलभूत अहिंसक स्वभावाचे द्योतक आहे काय? कीं त्याचे उत्तर इतरत्र शोधावे लागेल? महात्मा गांधींसारझे उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या देशाला एक सचोटीचे आदर्श म्हणून लाभले आहे त्या देशाने इतक्या अल्पकाळात इतक्या अविश्वसनीय पातळीवर भ्रष्ट कां व्हावे? योग्य साधनांचाच उपयोग करण्याबद्दल कटाक्ष ठेवून आपले ईप्सित त्यानुसार बेतण्याऐवजी आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कुठलेही बरे-वाईट साधन वापरायला आपण तयार झालो आहोत?
आपल्या धर्मातील बहुसंख्य असलेल्या एका समाजावर ज्या हिंदूंनी अस्पृश्यता लादली आणि चातुर्वण्याच्या नावाखाली त्या समाजाला दूर ठेवण्यासाठी जगातील एक सर्वात कडक अशी प्रणाली राबविली त्या समाजाला स्वतःला सहिष्णु म्हणवून घ्यायचा दावा करायचा हक्क तरी आहे काय? जर नसेल तर हा देश असा निधर्मी कसा राहिला आहे? आणि येत्या कांहीं वर्षात तो आणखी मजबूत होण्याची अपेक्षासुद्धा आपण कशी करू शकतो? समाजातील पदक्रम आणि स्थान यांचे महत्व जाणून ते मानणारे आणि अशा विषमतेला स्वीकारणारे आपण स्वतःला लोकशाही प्रवृत्तीचे कसे म्हणवून घेतो? आणि जर म्हणवून घेत नसू तर आपल्या देशात सांसदीय लोकशाही जगलीच नव्हे तर बहरली कशी? ज्या देशातले सुशिक्षित लोक घरकामाला असलेल्या नोकराना ते अर्धमेले होईपर्यंत मारतात, ज्यांच्यावर खटला चालू आहे अशा लोकांकडून कबूलीजबाब काढण्यासाठी त्यांना अंध करतात किंवा जास्त हुंड्यासाठी बायकांना ठार मारतात असे लोक स्वतःला अहिंसक म्हणून मिरवू शकतात कां? जर नसेल तर गांधीजींचे जुने अहिंसेचे डावपेच कसे काय यशस्वी झाले आणि नेताजी आणि भगतसिंग यांच्यासारख्यांच्या क्रांतिकारी उन्मादाला इतके मूठभरच अनुयायी कां मिळाले?

"भारतीयः कसा मी? असा मी!" Being Indian या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
अनुवादकाचे निवेदन
दोन-तीन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले Being Indian हे पुस्तक वाचले. भारतीय लोक जसे वागतात तसे ते कां वागतात याची चर्चा या पुस्तकात आहे. उदा. आपण फितुरी कां करतो, पैसे कां खातो, दांभिक कां आहोत, आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे कां असतात वगैरे वगैरे! मला तर हे पुस्तक वाचताना "आपण आरशात तर पहात नाहीं ना" असाच भास होत होता आणि संपविल्यावर वाटले कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे एवढेच नव्हे तर प्रत्येक पदवीच्या अभ्यासक्रमातही ते लावले गेले पाहिजे.
माझे वडील रोज गुरुचरित्र वाचायचे, माझी आई आजही शिवलीलामृताचा एक अध्याय रोज वाचते, मी कांहीं स्तोत्रें म्हणतो. त्याचप्रमाणे या पुस्तकाची दहा-एक पाने रोज प्रत्येक भारतीयाने वाचावी असे मला वाटते.
"न्यूक्लियर डिसेप्शन" हे पुस्तक मी खूपच अलीकडे वाचले. पण ते वाचल्यावर जसा मी प्रभावित झालो तसाच मी Being Indian वाचल्यावरही झालो होतो. पण त्यावेळी मी मराठीत लिहायला सुरुवात केली नव्हती. पुढे "ई-सकाळ", "उत्तम कथा" व त्यानंतर 'मिसळपाव'वर लिहायला लागल्यावर जरा आत्मविश्वास आला. मग चांगल्या इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला पाहिजे हे मनाने घेतले. जमेल कीं नाहीं याची खात्री नव्हती. म्हणून भीत-भीतच "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकाचे रूपांतर मी करू लागलो. त्याला वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून 'सकाळ'ला याबाबत विचारायची मी हिंमत केली. 'सकाळ'ने हे लेखन मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी निवडले व दर आठवड्याला एक प्रकरण असे तिथे हे रूपांतर प्रसिद्ध होऊ लागले. सकाळच्या प्रचंड वाचकांपुढे आपल्या लिखाणाचा काय परिणाम होतो हे पहाताना मी माझा श्वास रोखूनच धरला होता. पण तिथे प्रचंड प्रतिसाद लाभला. मला चक्क "फॅन मेल्स" येऊ लागल्या व 'फेसबुक'वर मला अनोळखी लोकांची मैत्रीची आमंत्रणे येऊ लागली!
"न्यूक्लियर डिसेप्शन" संपल्यावर "आता नवा प्रकल्प कुठला" अशी विचारणा 'सकाळ'च्या वाचकांकडून होऊ लागली व जर मूळ लेखकाची परवानगी मिळाली तर Being Indian चा अनुवाद करायचा हा मनसुबा मी जाहीर करून टाकला.
श्री. वर्मांचा पत्ता शोधायला सुरुवात केली. त्यात खूप प्रयास पडले पण सुदैवाने इथल्या 'जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर'चे (JNICC) प्रमुख श्री. सिंग यांच्याशी बोलतांना या पुस्तकाचा मी गप्पात उल्लेख केला व वर्मांबद्दल कौतुकाचे शब्द काढले. हा उल्लेख केल्यावर श्री. सिंग म्हणाले की ते श्री. वर्मांना 'गुरू'स्थानी मानतात व ते माझ्या वतीने शब्द टाकतील. दरम्यान Being Indian या मूळ पुस्तकाच्या 'पेन्ग्विन इंडिया' या प्रकाशकांना मी लिहिले तिथून मला वर्मांच्या एजंट श्रीमती मीता कपूर यांचा ID मिळाला. मग त्यांना लिहिले.
तेवढ्यात मला वृत्तपत्रातील एका बातमीवरून कळले कीं श्री. वर्मा सध्या थिंपूला आपले राजदूत आहेत. 'गूगल'वरून मी तिथल्या दूतावासाचा फोन नंबर शोधून तिथे फोन केला. श्री. वर्मा रजेवर होते पण त्यांच्या स्वीय सचिवाकडून मला त्यांचा ई-मेल ID मिळाला. मग मी श्री वर्मांना थेट लिहिले. मला होकार देण्यापूर्वी त्यांना प्रकाशकाकडून मिळालेला होकार पहायचा होता. 'सकाळ'च्या श्री. सम्राट फडणीस यांच्याकडून होकाराची मेल आल्याबरोबर मी ती श्री वर्मांना पाठवली. त्यानंतर एका तासात वर्मांनी मला परवानगी दिली!
शेवटी काल रात्री बसून मी प्रस्तावना अनुवादित केली. आता जसजशी प्रकरणे लिहून होतील तसतशी मी इथे प्रकाशित करेन.
"न्यूक्लियर डिसेप्शन"ला जसा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसा या मालिकेलाही देतील अशी आशा करून सुरुवात करतो.
------------------------------------------------
"भारतीयः कसा मी? असा मी!"
Being Indian या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
प्रस्तावना
मूळ लेखकः श्री. पवनकुमार वर्मा, भूतान येथील भारताचे राजदूत,
अनुवादः सुधीर काळे
©सुधीर काळे (मूळ लेखकांच्या वतीने)
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकाची आहेत.)

गंगा नदी हिमालयातून वहात जिथून खाली येते त्या हरिद्वारला सर्वच हिंदू लोक अतीशय पवित्र स्थान मानतात. इथून खाली उतरून आणि मध्य भारतातील अनेक मैलांचा सपाट प्रदेश पार करून गंगा शेवटी समुद्राला मिळते. हरिद्वारला चाललेल्या धार्मिक पूजा-अर्चा आणि प्रार्थना यांच्या गजबजाटात कांहीं लोक ऐन हिंवाळ्यातसुद्धा गंगेच्या बर्फासारख्या गार आणि उथळ प्रवाहात अनवाणी उभे असलेले दिसतात.
त्यांच्या हातात एक पारदर्शक काचेचे छोटेखानी तावदान असते आणि या वेगाने वहाणार्या गंगेच्या उथळ प्रवाहाकडे ते त्या तावदानातून अनिमिष नेत्रांनी तासन् तास पहात उभे असतात. त्यांच्या या पापण्यांची उघडझापही न करता गंगेच्या प्रवाहाकडे पहाणार्या दृष्टीची एकाग्रता शेजारीच दर्शनासाठी व उपासनेसाठी जमलेल्या भाविकांपेक्षा जास्त उत्कट वाटते. पण या एकाग्र दृष्टीचा हेतू कांहीं वेगळाच असतो. कारण हे लोक प्रार्थनाही करत नसतात किंवा मृतात्म्यांसाठी मोक्षसाधनेसाठी कुठली कर्मकांडे वगैरेही करत नसतात. त्यांची एकाग्रता केवळ गंगेच्या प्रवाहाबरोबर वहात येणार्या नाण्यांवर असते आणि वहात येणारी अशी नाणी दिसली कीं आपल्या पायांनी ते ती नाणी चापल्याने उचलतात (व म्हणूनच ते अनवाणी उभे असतात).
एक "राष्ट्र" म्हणून भारताच्या गुणदोषांचे व वैशिष्ट्यांचे चित्रण करणे ही फारच अवघड गोष्ट आहे. भारतीयांची व्याख्या करणेही महाकठिण. आणि आता हा समाज इतिहासाच्या काळोखातून जागतिकीकरणाच्या प्रखर प्रकाशझोतात येण्याच्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असल्याने हे काम अधीकच कठिण झाले आहे. भूतकाळाच्या संदर्भात आणि भविष्यकाळाच्या जडण-घडणीत आपण खरोखर कोण आहोत हे समजून घेण्याचा एक प्रयत्न या पुस्तकात करण्यात आलेला आहे. या प्रयत्नात अनेक धोके आहेत. भारत हा अतीशय विशाल व वैविध्यपूर्ण देश असल्यामुळे आणि प्रत्येक सामान्य (किंवा ढोबळ) विधानाला उल्लेखनीय अपवाद असल्यामुळे भारताचे वर्णन सोयिस्कर अशा ढोबळ व्याख्येने करणे अशक्यच आहे. शिवाय सारख्या वाटणार्या प्रत्येक गोष्टीत कांहीं तरी ठळक निराळेपण दिसते. म्हणून या पुस्तकातील एकाद्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या किंवा स्वतःबद्दलच्या समजांना धक्का देणारे वर्णन इथे दिसले तर त्याबद्दल अशा वाचकांची मी आधीच माफी मागू इच्छितो.
माझा उद्देश भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल शक्य होईल तितके खरेखुरे चित्र रंगविणे हा आहे पण मला हेही माहीत आहे कीं सगळीकडे लागू होईल असे कुठलेच सत्य नसते, त्याला अपवादही असू शकतात.
मी इथे हेही नमूद करू इच्छितो कीं मी कित्येक ठिकाणी मी हिंदू आणि भारत हे शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत ते कुठल्या आंधळ्या श्रद्धेपोटी किंवा दुरभिमानापोटी वापरलेले नसून केवळ भारत हा हिंदूंची प्रचंड बहुसंख्या असलेला देश आहे म्हणून वापरले आहेत. त्यातले कांही स्वभावविशेष असे आहेत की ते सर्व धर्माच्या सर्व भारतीयांना लागू होतात.
भारत आज आकाशात झेप घेण्यासाठी धावपट्टीवर सज्ज असलेल्या विमानासारखा उभा आहे पण या प्रगतीमागची कारणे सध्याच्या "Feel Good"च्या हर्षोन्मादाच्या लाटेपलीकडे जाऊन तपासली पाहिजेत. इतिहासाच्या मुशीत हजारो वर्षें राहिलेल्या आपल्या समाजाच्या वागणुकीचे पृथःकरण करताना हे लक्षात ठेवले पाहिजे कीं याबाबतीतले कुठलेच चित्र पूर्णपणे काळे किंवा शुभ्र नसते. प्रत्येक गोष्ट पूर्णपणे बरोबरही नसते आणि प्रत्येक गोष्ट पूर्णपणे चूकही नसते. म्हणूनच अशा देशाचे आणि नागरिकांचे चित्र रंगवताना आणि आपल्या ताकतीच्या पायावर आधारित जमा-खर्चाची कीर्दवही लिहिताना आपल्या सामर्थ्याबद्दल एक तर्हेचा समतोल साधून आपल्यातील कांहीं उघड दिसणार्या दौर्बल्याची नोंद घेऊन शेवटी आपल्या सामर्थ्यांमुळे आपला विजय होईल अशा विश्वास ठेवणे जरूरीचे आहे. आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपल्या समाजाची बांधणी यासारख्या गोष्टी जमा-खर्चाच्या कीर्दवहीत महत्वाची भूमिका बजावतात. याशिवाय आपली अथक चिकाटी, लवचिकपणा, आपल्या आकांक्षा व महत्वाकांक्षा याही महत्वाच्या भूमिका बजावतात. भारतीयांचे विनाकारण गोंधळ निर्माण करण्याचे "कौशल्य", एकाद्या कमजोरीचे सामर्थ्यात रूपांतर करण्याची हातोटी आणि आपले सुदैव यांचाही या जमा-खर्चात समावेश केला पाहिजे.
या पुस्तकाबद्दलचे संशोधन अनेक वर्षें चालू आहे पण या पुस्तकाचा बराचसा भाग मी सायप्रसला भारताचा राजदूत असतानाच्या काळात लिहिलेला आहे. मला अत्यंत प्रिय असलेल्या या विषयावर लिहिण्यासाठी सायप्रस या सुंदर बेटाने मला एक सुरेख पार्श्वभूमी आणि गजबजाटापासून दूर ठेवणारे अंतर मिळवून दिले. या पुस्तकाची कल्पना सुचविल्याबद्दल (त्यावेळी) पेन्ग्विन कॅनडाचे श्री डेव्हिड डेवीडार यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच पेन्ग्विन इंडियाचे श्री रवी सिंग आणि श्री व्ही. के. कार्तिक आणि या पुस्तकाचे संकलन केल्याबद्दल नंदिनी मेहता यांचेही मी आभार मानतो. या पुस्तकातील संदर्भाबाबत दिलेल्या त्रासाबद्दल मालिनी सूद यांच्याकडे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. लिखाण करताना तनमनधन विसरून त्यात मग्न होण्याची माझी कामाची पद्धत हसतमुखाने सोसण्याची माझ्या कुटुंबियांना आता संवय झाली आहे. भारतीय संस्कृतीबद्दल खूप ज्ञान असलेल्या माझ्या दिवंगत आईची मदत मला संदर्भाबाबत होत असे. मुलगा वेदांत आणि माझ्या मुली मानवी आणि बताशा आणि त्यांचा मित्र रिषभ पटेल या सर्वांनी संशोधनकार्यातील माझे मदतनीस म्हणून उत्साहात काम केले आहे. माझी पत्नी रेणुका हिची सहनशक्ती आणि तिची मदत तसेच या पुस्तकाच्या विविध बाजूंवरील तिची मते यांबद्दल मी तिचाही ऋणी आहे.
-------------------------------------------------------

About the author of "Being Indian"
Pavan K. Varma graduated with honours in History from St. Stephen's College, Delhi, and took a degree in Law from Delhi University. A member of the Indian Foreign Service, he has served in Moscow, in New York at the Indian Mission to the United Nations, and as India's High Commissioner in Cyprus. He has been Press Secretary to the President of India, Official Spokesman for the Foreign Office, and is at present our ambassador to Bhutan.
He is the author of Ghalib: The Man, The Times; Krishna: The Playful Divine; Yudhishtar and Draupadi: A Tale of Love, Passions and the Riddles of Existence; The Great Indian Middle Class; The Book of Krishna; and Maximize Your Life (with Renuka Khandekar), all published by Penguin. He has also translated Kaifi Azmi (Selected poems) and Atal Bihari Vajpayee (21 Poems} into English for Penguin.

Subscribe to:
Comments (Atom)